चीनमधल्या झीअॅन शहरात 1300 ड्रोन्सनी एकत्र आकाशात उड्डाण घेत जणू नृत्याविष्कार सादर केला. हे ड्रोन्स आकाशात सलग 13 मिनिटं उडत होते. त्यांनी यापूर्वी नोंदला गेलेला गिनीज वर्ल्ड रेकॉर्डही मोडला आहे. ड्रोन्सनी आकाशात हाय स्पीड ट्रेन, फुलपाखरं असे विविध 3D आकार साकार केले.